निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी 22- पालघर जिल्हा (अज) यांनी दिनांक 17/3/2024 रोजी निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक जाहीर केली पालघर लोकसभा मतदारसंघाची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. राज्याच्या शेजारील दादर नगर हवेली व गुजरातच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आदर्श संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी मा.गोविंद बोडके यांनी दिली.जिल्हा प्रशासनाच्या तयारी बाबत माहिती देताना ते म्हणाले,की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे.जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मा.भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मा.अर्पणा सोमानी आदी यावेळी उपस्थित होते.26 एप्रिलला पालघर व लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 मे रोजी उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे. 6 मे रोजी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची संधी आहे.20 मे रोजी मतदान असून 4 जून रोजी मतदान मोजणी होणार आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू,विक्रमगड, बोईसर,नालासोपारा,वसई, पालघर अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये 2250 मतदान केंद्रातून 13 सहाय्यक मतदान केंद्र असणार आहे. पालघर जिल्ह्यात 5 संवेदनशील मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे अतिशय बारकाईने लक्ष असणार आहे. कोसबाड भागातील 124 ते 127 मतदान केंद्र, पालघर मधील 23 क्रमांकचे मतदान केंद्र संवेदनशील आहे. जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात 21लाख 689 मतदार असून यामध्ये 10 लाख 99 हजार 743 पुरुष तर 10 लाख 729 महिला मतदार आहेत. 217 तृतीयपंथी मतदार आहेत. तर जिल्ह्यात 326 नोकर मतदार आहेत. जिल्ह्यात 15 हजार 848 दिव्यांग मतदार असून त्यापैकी 9 हजार 97 पुरुष तर 679 महिला आहेत. दोन तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान केंद्रात येऊन न शकणाऱ्या 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना तसेच दिव्यांगांना घरून मतदान करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यासाठी निवडणूक विभागाने व्यवस्था केली आहे. प्रशासन यांच्या शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. जिल्ह्यातील 6 मतदार संघासाठी 2263 मतदार केंद्रावर ईव्हीएम कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 2723 ची आवश्यकता असून यापैकी आवश्यकता असून त्या त्यापेक्षा जास्त म्हणजे 477 बॅलेट प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. तर 2723 कंट्रोल युनिटची आवश्यकता असताना 3144 कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. 2925 पॅट मशीनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात 3357मशीन उपलब्ध झालेली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रशासन सज्ज असून निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी दखल घेण्यात येणार असून नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आलेला आहे. या नियंत्रण कक्षा मार्फत स्टॅटिक सर्विलियंस, व्हिडिओ सर्विलियंस व्हिडिओ विविंग टीम व फ्लाईंग स्क्वाड नेमण्यात आले आहेत. मतदाराच्या 10 दिवस अगोदर नव मतदारांचा मतदार होण्याची व नाव नोंदवण्याची संधी उपलब्ध आहे. जिल्ह्यात किंवा जिल्हा राज्याबाहेरचा स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्यासाठी जिल्ह्यात नाव असलेल्या ठिकाणी येऊनच मतदान करावे लागेल त्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही असे जिल्हा अधिकारी यांनी सांगितले आहे.
पालघर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश उईके
संपर्क-7840924441