Homeमनोरंजनराज्यस्तरीय प्रश्नमंजुषा परीक्षेचा निकाल जाहीर....

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा परीक्षेचा निकाल जाहीर….

विचार महामानवाचे नवयुवा मंच भंडारा गोंदियातर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवारी (दि.17) दुपारी 12 वाजता घेण्यात आली होती.या स्पर्धेचा निकाल शनिवारी (दि.20) रात्री 8 वाजता जाहीर करण्यात आला.यात 3001 रुपयांचे प्रथम पारितोषिक सचिन डी. सोनपित्रे (चंद्रपूर), 2001 रुपयांचे द्वितीय पारितोषिक सचिन डी.काळे (अमरावती),1001 रुपयांचे तृतीय बक्षिस प्रगती के. खोब्रागडे (नागपूर),501 रुपयांचे चतुर्थ पारितोषिक रंजित एम. पवार (लातूर) तर उत्तेजनार्थ बक्षिस योगेश एस. वासनिक (लाखांदूर ), रामा एस. गोधणे (नांदेड), महेश एस. राऊत (अमरावती) यांना देण्यात येणार आहेत,आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्र वाटण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण व आयोजनासाठी परवेश मेश्राम,लोमेश सांगोडे,आकाश शेंडे, वैभव मोटघरे, हर्षपाल लोणारे,विश्वरत्न रामटेके,प्रशिक बोरकर, दिपेंद्र उके यांनी परीश्रम घेतले.

गोंदिया जिल्हा समन्वयक,मा.अश्विनज डोंगरे,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular