HomeUncategorizedअकोला जिल्ह्यात बाळासाहेब आंबेडकरांनी कोणाचे प्रस्थ वाढवले ?

अकोला जिल्ह्यात बाळासाहेब आंबेडकरांनी कोणाचे प्रस्थ वाढवले ?

मंगळवार,दि. २३.०४.२०२४
अकोला जिल्हा मा बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं “स्वतः चं ” प्रस्थ वाढवलयं का ? मी स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगतोय.तर अजिबात नाही !! हे वाचून वंचितच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकारऱ्यांना राग आला तर येऊ देत.

१९८० ते २०२४ असे तब्बल ४४ वर्षे अकोल्याच्या भूमित बाळासाहेब आंबेडकर अविरतपणे कार्यरत आहेत. ६ वर्षे बाळासाहेब राज्यसभेवर होते. १३ महिने अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात व नंतर परत ५ वर्षे असे १३ ते १४ वर्षे संसदेत खासदार म्हणून होते. ४४ वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत आपली कर्मभूमी म्हणून अकोल्याला निवडलं आणि या मातीत रममाण झाले. इथे काम करत असताना आपण एक गोष्ट प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे की, बाळासाहेबांनी अकोल्यात (मी पर्टिक्यूलर अकोला जिल्हा म्हणतोय हे लक्षात घ्या.)स्वतः चे प्रस्थ वाढवले का ?

तर उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. बाळासाहेबांची जिल्ह्याच्या राजकारणात जबरदस्त पकड आहे. याचा त्यांनी कधीही व्यक्तिगत पातळीवर गैरफायदा उचलेला दिसत नाही. बाळासाहेबांनी एकच केले.

१ )ज्यांना राजकारणाची ABCD माहीत नाही,
२ )ज्या समाजाची संख्या अतिशय कमी आहे, नगण्य आहे,त्यामुळे अशी धारणा की, आपण निवडून येऊ शकत नाही.
३ ) कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी नाही.
४ ) अशिक्षित असल्याने इतर पक्ष संधी तर दूर साधे ग्रामपंचायतीचे तिकीटही नाकारतात.
५ ) आर्थिक परिस्थिती नादारीची हलाखीची, पोटापाण्यासाठी मोलमजुरी करणे भाग.
६ ) प्रस्थापित समाजव्यवस्थेने थोपविलेल्या गावगाड्यात अलुतेदारी, बलुतेदारी करणाऱ्या समूह,
७ ) प्रस्थापितांनी हिनवलेला, नागवलेला, गुलाम म्हणून राबविण्यालेल्या.
८ ) प्रस्थापितांच्या कुटुंबाशिवाय स्वजातीतील गरीबांना संधी नाही !!

“अशा सर्व समूह घटकांचे मनोबल वाढवून,. त्यांच्यात स्वाभिमान जागवून बाळासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आर्थिक व राजकीय वंचित असलेल्या समाज व समाजातील व्यक्तीतींचे प्रस्थ वाढविलेले आहे.वंचित समूहाचे प्रस्थ वाढवलेले आहे.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रा.प.सदस्य ते मनपा, नपा, नपं, जि. प व पंस अध्यक्ष सभापती सदस्य, आमदार पदी निवडून जाण्याची संधी बाळासाहेब आंबेडकर आपल्याला देऊ शकतात एवढा कॉन्फिडन्स, आशावाद विश्वास निर्माण केला.कोळी समाजाचा जिप अध्यक्ष, पुढे आमदार व मंत्री, धनगर समाजाचा पं स सभापती व पुढे तीन टर्म आमदार, तेली समाजाचा जिप अध्यक्ष, बारी समाजाचा आमदार, माळी मुस्लिम बौद्ध समाजाचे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बंजारा, कुणबी, वंजारी, मराठा,टाकोणकार,बेलदार, मातंग, नाव्ही, सोनार,भोई, मुस्लिमशहा,पाथरवट, मारवाडी,गवळी पाटील, दखनी मराठा या इतरही लहान लहान जाती समूहाला स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ताधारी करून बाळासाहेबांनी या समूहाचे प्रस्थ वाढवलेले आहे.सर्व समाजाला मान दिला, नेतृत्व करण्याची संधी दिली.

४४ वर्षाच्या राजकारणात त्यांनी कधीच मी ..मी ..पणा केला नाही.आपले स्वतःचे नेतृत्व थोपवले नाही. एक समूह भावना निर्माण केली की,बांधवांनो-सहकाऱ्यांनो, या तुम्ही सत्ता हातात घ्या, तुम्ही सत्ताधारी व्हा.एखाद्या वेळी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात एखाद्या जातीचे वीस पंचवीस मते असतील तरी सुद्धा अशा समाजाला व्यक्तींना बाळासाहेबांनी निवडणूकीत संधी दिली.काही प्रसंगी त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आपल्या जातीची संख्या जास्त असलेल्या एखाद्या कार्यकर्ता नाराज होते. परंतु बाळासाहेब त्याची समजूत काढतात. त्यांना समजावून सांगतात,” अरे बाबा इतर पक्ष या लहान लहान समाजाला संधी देत नाहीत. मग आपणही त्यांना संधी देणार नसू तर मग काय त्यांनी फक्त इतरांना शिक्केच मारावे का ? त्यामुळे त्या समाजाचे वंचितपण घालवण्यासाठी त्यांना संधी दिलीच पाहिजे !!” बरेचदा तर गंमती जमती रंगल्या तर काही लोकं चर्चा करतात,” अरे ब्वा हे पाय,तुले भाजपसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी तिकीट देत नसतील ना ? तं तर सरळ बाळासाहेबाले भेट. तुयं तिकीट एकदम पक्कं होतें.जाय तु !!”

४४ वर्षाच्या राजकारणात बाळासाहेबांनी आपल्या पक्षात विविध पदांची संधी देऊन व निवडणूकीच्या राजकारण संधी उपलब्ध करून देऊन जिल्ह्यात अनेकांना मोठे केले आहे.सातत्याने ओबीसी, मायक्रो ओबीसी मुस्लिम आदिवासी बौद्ध गरीब मराठा या समाजाला- समूहातील व्यक्तींना बाळासाहेबांनी मोठे केले,लाल दिव्याची गाडी दिली,समाजात मान रूतबा इज्जत शान वाढवला,प्रस्थ वाढवले.

सर्व जाती धर्मामध्ये आपसी सलोखा कायम राहिला पाहिजे, समाजात शांतता नांदली पाहिजे,अशी भूमिका बाळासाहेबांनी सबंध राजकीय कारकिर्दीत घेतली व घेत आलेत.

जो नेता इतरांचे हित पाहतो, व्यक्ती पेक्षा त्या त्या समाजाचे हित पाहतो.अशा या लोककल्याणकारी नेत्याला अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून देणे हि बहुजन ओबीसी मुस्लिम अल्पसंख्याक आदिवासी गरीब मराठा दलित बौद्ध व इतर मायक्रो ओबीसींनी बाळासाहेब आंबेडकरांना निवडून पाठविणे हि काळाची गरज आहे. मा बाळासाहेबांच्या इ व्हि एम वरील प्रेशर कुकर निशाणी समोरील ५ नंबरचे बटन दाबून बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड मतांनी विजयी करा हि कळकळीची नम्र विनंती. धन्यवाद !!


सुरेश रा शिरसाट, अकोला
RELATED ARTICLES

Most Popular