Homeबड़ी खबरेपालघर तालुक्यामधील रमाई नगर पंचाळी येथे भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा अंतर्गत...

पालघर तालुक्यामधील रमाई नगर पंचाळी येथे भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा अंतर्गत बोईसर शाखेच्या वतीने बाळ संस्कार शिबिर समारोप संपन्न.

वार सोमवार, दिनांक २७ /०५/२०२४ रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या ८९ व्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा अंतर्गत बोईसर विभाग / महिला विभाग शाखेच्या विद्यमाने धम्मरत्न बुद्ध विहार रमाई नगर पंचाळी येथे बाळ संस्कार शिबिर समारोप संपन्न झाला. कार्यक्रमाला पुज्जनिय भंते-सुमेध बोधि ( भिक्खू संघ कोषाध्यक्ष, चैत्यभूमी दादर ) हे उपस्थित होते. यांच्या हस्ते महापुरुषांच्या मूर्तीला व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलित करण्यात आले


रमाई नगर पंचाळी गावातील जेष्ठ कार्यकर्त्या तथा भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा महिला शाखा संघटक, केंद्रीय शिक्षिका आद. सुमनताई लोखंडे यांच्या प्रयत्नाने बाळ संस्कार शिबिराचे आयोजन केले. विशेषता स्वतःआद. सुमनताई लोखंडे यांनी १० दिवस परिश्रम घेतले आणि शिबिर सफल केले. बाळ वयातच धम्माचे संस्कार होण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला एकूण १४ शिबिरार्थी प्रशिक्षण घेण्यासाथी उपस्थित होते. खेळी-मेळीच्या वातावरणात शिबिर संपन्न झाले.


प्रत्तेक दिवशी नवीन विषय देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा मधील केंद्रीय शिक्षक प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी उत्तम पद्धतीने धम्म समजावून सांगितले. कार्यक्रमाला धम्मदेसणा देण्यासाठी पुज्जनिय भंते-सुमेध बोधि ( भिक्खू संघ कोषाध्यक्ष, चैत्यभूमी दादर ) उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.


पालघर जिल्हा अध्यक्ष आद. प्रफुल्ल सुपे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले व उपस्थितांना २२ प्रतिज्ञा वधवून घेतल्या. रमाई नगर पंचाळी ग्रामशाखेच्या वतीने सर्व पधाधिकारी यांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पालघर जिल्हा अध्यक्ष आद. प्रफुल्ल सुपे गुरुजी, पालघर जिल्हा कोषाध्यक्ष आद. सिद्धेश जाधव गुरुजी, पालघर जिल्हा संरक्षक सचिव, विभागीय सहाय्यक, समता सैनिक दल, आद. राजेश मोरे गुरुजी. बोईसर विभाग शाखा अध्यक्ष आद. विजय मोरे गुरुजी, समता सैनिक दल, आद. काळे गुरुजी. भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा महिला शाखा संघटक केंद्रीय शिक्षिका आद. सुमनताई लोखंडे, धम्मरत्न बुद्ध विहार समितीचे सदस्य व बौधाचार्य. आद. दिपक लोखंडे गुरुजी, बौधाचार्य. आद. यश लोखंडे गुरुजी, बौधाचार्य. आद. आयुष लोखंडे गुरुजी, माजी श्रामणेर आद. अभिनव जाधव. , माजी श्रामणेर आद. समीर जाधव, माजी श्रामणेर आद. राज शेलार. रमाई नगर पंचाळी गावातील जेष्ठ कार्यकर्ते व धम्मरत्न बुद्ध विहार समितीचे सदस्य आद. दत्तात्रेय जाधव गुरुजी, गावातील महिला कार्यकर्त्या आयुनि. दर्शनाताई जाधव, आयुनि. भारतीताई मोहिते, आयुनि. दिशाताई जाधव, प्रशिक्षणार्थी बालके व गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते

पालघर जिल्हा समन्वय, सिद्धेश जाधव. प्रकाशपर्व न्यूज

RELATED ARTICLES

Most Popular