राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा गावात राहणारे श्री.भीमराव विठ्ठलराव कुर्हाडे एक प्रचलित उत्तम व्यक्तिमत्व आहेत.मागिल 15 वर्षापासून ते देशाच्या संपत्तीचे रक्षणासाठी महत्त्वाचं सहभागाचा वाटा आहे.त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कुठेही भ्रष्टाचार आढळला तर ते आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला भ्रष्टाचार लक्षात आणून देत असतात.असेचं प्रकरण अमरावतीत 2022 मध्ये करतखेड येथे परत घडला आहे.युवराज खेडकर व अमित काळकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केले होते पण तक्रार केल्यानंतर सुद्धा दर्यापूर तालुक्यातील पोलिस प्रशासन व तहसीलदार यांनी वाळुमाफियावर कुठलाही गुन्हांची नोंद करण्यात आली नाही म्हणून राष्ट्रीय संपत्तीचे अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी व वाळुमाफीयावर गुन्हा व्हावे म्हणून मा.भिमराव कुर्हाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर 8 लक्ष 89 हजारचं दंड ठोकावण्यात आले आहे. तसेच रामतीर्थ,करतखेड,लासुर, सोनखेड,भुईखेड,चांडोळा येथील नदीपात्रातून दिवस-रात्र वाळूचे उत्खनन चालू आहे,स्थानिक तलाठी,पोलीस पाटील,दर्यापूर तालुक्याचे पोलिस निरीक्षक,तहसीलदार तसेच डायल 112 यांना सुद्धा कळवल्यानंतर व विडीओ क्लिप पाठवल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचे आक्षेप घेत नाहीत. याउलट वाढू तस्करांकडून तक्रारदारावर हल्ला केला जातो व तसेच त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली जात असते.अवैध उत्खनन बंद नं झाल्यास १ जुन शनिवार रोजी नदीपात्रात भिमराव कु-हाडे हे आंदोलन करणार आहेत आंदोलन दरम्यान त्यांच्या जिवीत्वास इजा निर्मान झाल्यास पोलीस प्रशासन व महसुल विभाग जबाबदार राहतील असे ते म्हणाले.
मा.हिम्मतराव गवई, अमरावती जिल्हा समन्वयक,(प्रकाशपर्व न्युज)