वार मंगळवार, दिनांक. १८/०६/२०२४ पालघर. मौजे पंचाळी, ता. जि. पालघर पश्चिम रेल्वे फाटक क्रमांक ५० येथे नागरिकांना येण्याजाण्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने भुयारी पूल बांधण्यात आले आहे. परंतु ते भुयारी पूल पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याने भरून जाते आणि ह्या समस्येचा रमाई नगर गावातील ग्रामस्थांचा रहदारीचा मार्ग बंद होतो. त्याबद्दल ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून रेल्वे विभागाला सदर समस्याचे निरसरन करण्यासाठी पत्र व्यवहार करीत आहेत. परंतु संबंधित भुयारी पुलाचे ठेकेदार ( DFCC ) व रेल्वे प्रशासन यांना ग्रामस्थांची समस्यावर उपाय योजना करता आली नाही. शेवटी ग्रामस्थांनी आपल्या समस्या पालघर जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनात निवेदन पत्र सादर केले आहे.
रेल्वे फाटक नं. ५० लगतचे भुयारी पूल हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. सदर भुयारी पूल हे पाण्याने भरलेले आहे. सदर भुयारी पूल मधील रस्ता हाच ग्रामस्थांसाठी एकमेव मार्ग आहे. सदर भुयारी पूल मधून गावातील विद्यार्थी, महिला, कामगार ये जा करीत असतात आणि वाहने ने आण करीत असतात. गावात आजारी व्यक्तीला, गर्भवती महिला, वयोवृद्ध महिला यांना दवाखान्यात नेण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागते. भुयारी पूल हे पाण्याने भरलेले असल्याने भुयारी पूल वापर करणे हे धोकादायक झालेले आहेत.
पालघर जिल्हाधिकारी साहेब नक्कीच ग्रामस्थांच्या सोबत उभे राहून संबंधित समस्यांचे निरसारण करतील हा ग्रामस्थांनी विश्वास दाखविला आहे.
आयु. सिद्धेश अरविंद जाधव. पालघर प्रतिनिधि, प्रकाशपर्व न्यूज चॅनल