Homeप्रदेशभारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्ह्याची बैठक ६ जुलैला संपन्न...

भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्ह्याची बैठक ६ जुलैला संपन्न…

दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रीय संरक्षक आद.महाउपासिका मिराताई आंबेडकर,राष्ट्रीय सल्लागार श्रध्देय ऍड.बाळासाहेब आंबेडकर,ट्रस्टी चेअरमन डॉ.हरिष रावलिया,ट्रिपोटिंग ट्रस्टी चेअरमन आद.ऍड.सुभाष जौंजाळे,ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भिमराव आंबेडकर आद.कॅप्टन प्रविण निखाडे साहेब (ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय विभाग)आद.एस.के.भंडारे(राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख)आद.भिकाजी कांबळे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष)आद.स्वातीताई शिंदे (महाराष्ट्र राज्य महिला विभाग अध्यक्ष) अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिमच्या वतिने कार्यरत असणाऱ्या सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी जिल्हा पश्चिम या शाखेची बैठक शनिवार दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता भिमनगर, समाजमंदिर ,जेलरोड येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस प्रविण बागुल (जिल्हाध्यक्ष),राजू जगताप (सरचिटणीस)मनोज गाडे (कोषाध्यक्ष)सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी,महिला पुरुष, बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक व शिक्षीका सर्व तालुका शाखांचे अध्यक्ष सरचिटणीस व कोषाध्यक्ष यांनी प्रामुख्याने उपस्थित राहीले. सदरील बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात येऊन कार्यवाही करण्यात आली. १)भंते सुमेधबोधी यांच्या वर्षावासाचे नियोजन करून प्रवचन मालिका राबविणे तसेच सभासद नोंदणीची (आजीव सभासद, वार्षिक सभासद, क्रियाशील सभासद यांच्या) यादी तयार करणे.२) बुद्धगया पर्यटनाचा कार्यक्रम, अंदाजपत्रक तयार करून सादर करणे. प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था भोजन आदीबाबत. ३) बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक व शिक्षिका यांची नावे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गॅझेट मध्ये समावेश करण्यासाठी अंतिम यादी तयार करणे. ४) अतिशय महत्त्वाचे म्हणजे जिल्हा शाखेच्या जमा खर्च अहवाल तयार करणे. आॅडिट करणे. त्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या रक्कमा तालुका शाखांकडून येणे बाकी असतील तसेच काही पदाधिकां-च्या रक्कमा देणे बाकी असेल. त्या संदर्भात कार्यवाही करणे. प्रत्येक विभागाचा अहवाल तयार करणे (संस्कार, पर्यटन व संरक्षण) ५) आपल्या संस्थेच्या धर्मदाय कार्यालयात तथा न्यायालयात सुरू असलेल्या केसेस बद्दल माहिती देणे. ६) दहावी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच बौध्दाचार्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवनिर्वाचित बौध्दाचार्य यांच्या सत्काराचे नियोजन, बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक व शिक्षीका पदाधिकारी मेळावा आयोजित करण्याबाबत अंतिम निर्णय घेणे. संवाद मेळावा आयोजित करण्यासाठी पुढील नियोजन करणे. ऐनवेळी येणारे विषयावर चर्चा व निर्णय घेणे. अशाप्रकारे या जिल्हास्थरिय बैठकीला असंख्य माननिय उपस्थित होते.

मा.श्याम जाधव,नाशिक जिल्हा समन्वयक,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular