HomeUncategorizedएससी - एसटी - एनटी - ओबीसी - अल्पसंख्यांक बांधवांनो आणि भगिनींनो…आत्मचिंतन...

एससी – एसटी – एनटी – ओबीसी – अल्पसंख्यांक बांधवांनो आणि भगिनींनो…आत्मचिंतन करा!

महामानव,विश्वभुषण,राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कठोर संघर्षामुळे भारतातील 7 हजार जातींना न्याय मिळाला. जनावरापेक्षा वाईट अवस्थेत जगणाऱ्या करोडो लोकांना , त्यांच्या पिढ्यांना मानवतेचे – सन्मानाचे जीवन मिळाले.
••• परंतु युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आपले उद्धारकर्ते आहेत हे या 7 हजार जातीचे लोक मानायला तयार नाहीत.
••• हे लोकं या महापुरुषाचा संघर्ष – त्याग – बलिदान विसरले आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने न चालता आपल्या सोयीनुसार वागत आहेत आणि पुन्हा गुलामगिरीच्या , वेठबिगारीच्या , जातीय विषमतेच्या , सामाजिक अन्यायाच्या ,राजकीय कोंडीच्या ,आर्थिक नाकेबंदीच्या, शैक्षणिक अधोगतीच्या विळख्यात सापडणार आहेत. ही सुरुवात झाली आहे. कारण…..
••• यांना शिक्षण मिळाले , नोकऱ्या मिळाल्या , पद मिळाले , पैसा मिळाला. मानपान मिळत आहे.या सर्व सुखांचा उपभोग घेण्यात हे लोक धन्यता मानत आहेत.
••• देशात आरक्षित जागेवर शिक्षण घेणारे , नोकरी करणारे लाखोंच्या संख्येने आहेत. त्यांनी आंबेडकरी मार्गाने चालायचे ठरवले तर देशात कोणत्याही प्रकारची विषमता शिल्लक राहणार नाही.
••• पण हेच लोक आपल्या नोकऱ्या , पोस्टिंग , प्रमोशन ,लाभाचे पद यासाठी आपली शक्ती वाया घालवत आहेत.
••• नोकरी करणारे स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी संघटना काढून त्यात वेळ आणि पैसा देतात. परंतु ज्यांच्यामुळे जीवनाला न्याय मिळाला , जगण्याला अर्थ प्राप्त झाला त्या महापुरुषाच्या संघटना , तत्व , ध्येय आणि विचारांना सोयीस्कररित्या विसरतात.
••• आंबेडकरी विचारांचे कोणतेही कार्य करीत नाहीत पण स्वतःला कट्टर आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या लबाडांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
••• एससी – एसटी – एनटी – ओबीसी – अल्पसंख्यांक आणि महिला या सर्वांना माझे वरील म्हणणे लागू पडते.
••• जे सत्य आहे.ते कोणाला वाईट वाटत असले तरी स्पष्टपणे मांडले पाहिजे हा देखील प.पु .बाबासाहेबांचा संदेश आहे .
••• लोकांना वाईट वाटेल म्हणून बोलणे टाळले तर ती देखील एक प्रकारची फसवणूक आहे. असे आम्ही मानतो.
पुन्हा कळकळीचे आवाहन करतो की , आंबेडकरी मिशन उभे करा.त्यासाठी समता सैनिक दलात सामील व्हा.

मा.धर्मभुषण बागुल
(राज्य अध्यक्ष-समता सैनिक दल)
(9921323281/7020558011)

RELATED ARTICLES

Most Popular