ज्या महामानवाने स्वतः अंधारात राहून आम्हला जगण्यासाठी खरा प्रकाश दिला, त्या प्रकाशाला आज आम्ही अंधारात नेत आहोत असा भास होत आहे, हे सत्यात उतरु नये, म्हणून प्रकाशाकडे जाणारा मार्ग सोडू नये.
आजची जमात प्रकाशाला अंधारात नेण्याची एक ही संधी सोडत नाही, दुर्भाग्य आपलच. का प्रकाशाकडे जाणारी आपलीच पावले मागे पडावी?
आपली वाट होती काट्याकुट्याची, सावली सुध्दा सोबत नव्हती, रस्त्यावर चालण्यासही बंदी होती, शिक्षणापासून कोसो दूर होतो, आपल जीवन साखळदंडात जखडलेले होत, त्यातून तुझी, माझी, ह्याची, त्याची सर्वांची मुक्तता होणे त्या महामानवाची आपल्या साठी सर्वात मोठी देणगी आहे, तरीही आम्ही प्रकाशाला अंधारात नेण्याची एकही संधी मात्र सोडत नाही.
तुझ्या जगण्याचा हिशेब तू लावणार कसा?
गावकुसाबाहेर राहणारा तू, काय खात पीत होता?कसं जीवन जगत होता, कर स्वतःला सवाल?
आज जे जिवन जगतो ते तुझ्या पूर्वजांनी नाही कमवलं हे तुला कस कळत नाही, तुला खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकारच नव्हता रे? कधी खऱ्या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे येशील!
तुझं जीवन किड्या मुंग्याहूनही बेहत्तर होत, त्या महामानवाने तुला माणूस बनवलं,
त्या महामानवाने आपली हयात,परिवार खर्ची घातला. फक्त तुला माणूस म्हणून जगता यावे यासाठी.
झोपडीही तुझ्या नशिबी नव्हती, जमीन जुमला कसा असणार? आज आहे तुझ्याकडे बंगला, गाडी, पैसा आणि धन दौलत, विचार स्वतःला एक सवाल मी कोणाचातरी देणे करी आहे.
तू जाताना सोबत काय नेशील? तू गेल्यावर तुझे सोबती घेतील आपसात वाटून तू कमवलेली सारी धन दौलत,तू कधी येशील अंधारातून प्रकाशाकडे.
तू कुठे कोणालाही दिसत नाही, पण काड्या घालण्यात कुठेच चुकत नाही. येणाऱ्या पिढीला तू काय देणारं आहे, तुझा इतिहास काय असेल, तू इतिहासच कधी वाचलास नाही, तुला सारं आयत मिळालं आहे.
तू कोणाचं तरी देणं लागतो हे का विसरतोस?
उठ जागा हो आणि ये अंधारातून प्रकाशाकडे. झाडे, पशू पक्षी जिवंत सारेच आहेतं, बघ तुला जिवंत रहाता येतं का मरून सुध्दा? ये अंधारातून प्रकाशाकडेआता तरी तू येशील का अंधारातून प्रकाशाकडे…..
कवी.सुनिल काशिनाथ शेलार (पालघर), +91-9767473919