सांगली.आज दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे साप्ताहिक वंदना आयोजित केलेली होती . या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे बोदाचार्य आयु. दयानंद आत्माराम कांबळे यांच्या हस्ते प्रथम महाकारुणिक भगवान बुद्ध व विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना पुष्प वाहून दीप व धूप प्रज्वलित करून अभिवाद न केले त्यानंतर संस्थेचे सह खजिनदार आयु. जगन्नाथ आठवले यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले त्यानंतर त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दयानंद कांबळे यांना धम्म देसना देण्यासाठी प्राचारण केले. त्यावेळी दयानंद कांबळे यांनी बौद्ध धम्म व त्यामधील महिला भिकुनी यांच्या बद्दल धम्मदेशना दिली ते म्हणाले की, महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध हा जगातला पहिला क्रांतिकारक पहिला विचारवंत तत्वज्ञानी व धम्म संस्थापक आहे ज्याने आपल्या विचाराने अधिष्ठान केंद्रबिंदू मानव व्यक्ती ठेवला आहे गौतम बुद्धांनी प्रचलित वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारले. माणसा माणसात समाज-समाजामध्ये जो उच्च नीच तेचा अंहगंड निर्माण झाला आहे त्याच्यावर प्रहार करणारा पहिला महामानव भगवान बुद्ध होय. वर्ण व्यवस्थेचे पुरस्कर्ते हे ब्राह्मण आहेत यांना त्यांनी आवाहन केले की जन्माने कोणी ब्राह्मण, क्षत्रिय ,वैश्य शुद्र होत नाही तर तो त्याच्या कर्माने होतो. सर्व मानव सारखे समान आहेत गौतम बुद्धांनी या वर्ण व्यवस्थेला अन्यायकारक समाजव्यवस्था ठरवले आहे. अशा वर्णव्यवस्थेचा काही उपयोग नाही ते मोडून तोडून फेकून दिले पाहिजे. ती उध्वस्त करण्याचे पहिले काम तथागत भगवान बुद्धांनी केले आहे. त्यांनी मानवाला मध्यम मार्गाचा स्वीकार करावा असे सांगितले आहे . धार्मिक कर्मकांड पाखंडेपणा त्यानी शिकवला नाही. मानवाची फसवणूक करण्याचा मार्ग सांगितला नाही. तर मानवाने मानवाशी सदाचारी बनून एकमेकांशी कृतज्ञ भावनेने राहावे हीच त्यांची अंतिम इच्छा होती. पाप- पुण्य ईश्वर ‘आत्मा ,देव दानव ,स्वर्ग दरक अशा भ्रामक कल्पना त्यांनी नाकारले आहेत. मानव हा ज्ञानी बनला पाहिजे तो न्यायी बनला पाहिजे सज्जन बनला पाहिजे तो वाईट विकारापासून मुक्त होणे म्हणजेच निब्बाण प्राप्त होय. निब्बाणा पर्यंत पोहोचायचे असेल तर आपल्याला धर्म आणि धम्म यातील काय फरक आहे हे स्पष्ट केला पाहिजे. धर्म ही संकल्पना खुळ्या समजुतींना आसरा देणारी आहे .रूढी, परंपरा ,अज्ञान दारिद्र्य, अंधश्रद्धा अन्याय ,अत्याचार, पिळवणूक ,वाईट कर्म थोतांड यांना तारा देणारे जननी म्हणजे धर्म होय . स्वर्ग नरक देव दानव, आत्मा परमात्मा नवस- सायास ,कर्मकांड ,भविष्यवाणी बुद्धीच्या व विज्ञानाच्या तर्काच्या कसोटीत न बसणारी अशा गोष्टी धर्म स्वीकारतो. धर्म हा माणसाच्या मनाचा कधीच विचार न करता तो एकमेकांच्या विरोधात झुंजवत ठेवतो. धर्म आणि धम्म यातील फरक समजला पाहिजे तरच तो धर्माचा नाद सोडून धम्माची कास धरतो .धम्माचा मार्ग स्वीकारतो धम्मात कोणत्याही प्रकारचे कर्मकांड नाही अंधश्रद्धा नाही जातिभेद नाही लिंगभेद नाही वंश वेध नाही तो पंचशीलाचे आचरण करतो तो आर्य आष्टांगिक मार्गाचा अवलंब करतो सम्यक विचार , संम्यक वाणी, सम्यक संकल्प सम्यक कर्म ,सम्यक व्यायाम सम्यक उपजीविका सम्यक स्मृर्ती सम्यक समाधी या आर्यअष्टागीक मार्गाचा अवलंब करतो. त्यामुळे मानवाच्या जीवनातील दुःख नाहीच होऊन त्याचे जीवन सुखकारक बनते असा विज्ञानवादी धम्म तथागत भगवान गौतम बुद्धाने समस्त मानव जातीला दिलेला आहे. यानंतर त्यांनी महिलांच्या विषयी आपले विचार व्यक्त करताना कृतज्ञता करुणा व्यक्त केली आहे. आपल्याला माहीत आहे की, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून १९७५ हे वर्ष जगभर साजरे करण्यात आले. त्या वर्षात अनेक महिला विषयी परिसंवाद , परिषदा ,चर्चा, साहित्य प्रकाशन ,महिलांचे मेळावे ,असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. मेक्सिको येथे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष परिषद घेण्यात आली. यासंदर्भात भारतीय स्त्रियांचा दर्जा प्राचीन काळी कसा होता हे पाहणे उचित ठरेल प्राचीन काळी स्त्रियांच्या बौद्धिक आणि सामाजिक दर्जा फारच उच्च प्रचिता प्रतीचा होता ज्या काळात जगामध्ये इतर कोणत्याही देशात स्त्रियांना इतका मान सन्मान नव्हता त्या काळात भारतीय स्त्रियांना तो मानसन्मान मिळत होता. परंतु नंतरच्या काळात मात्र स्त्री ही माया शुद्राप्रमाणे नीच आणि उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. त्यांना कोणतेही मानाचे स्थान नव्हते त्यांना घरात दाबून ठेवले जात होते. चूल आणि मूल अशी अवस्था करण्यात आली होती. संतती उत्पन्न करणे त्यांचे पालन पोषण करणे घराची जबाबदारी सांभाळणे. लहानपणी वडिलांच्याआज्ञेखाली मोठेपणी नवऱ्याच्या व म्हातारपणी मुलांच्या अज्ञात धाकात राहावे लागत .असे बुद्धाच्या काळात मात्र स्वातंत्र समता आणि बंधुत्व या तीन तत्त्वावर आधारलेली सामाजिक उत्थानाच्या विचाराने महाकारुणिक भगवान बुद्धांच्या काळात स्त्रियांची हीन अवस्था संपायला सुरुवात झाली. त्यांना पुरुषाप्रमाणेच समान व मानाचा दर्जा प्राप्त होऊ लागला मानव समाजाच्या उत्थानात त्यांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे असा विचार पुढे येऊ लागला भगवान बुद्धांनी स्त्रिया बद्दल अतिव आदर होता म्हणून त्यांनी स्त्रियांचा वेळोवेळी गौरव केला आहे . बौद्ध स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समानतेची समाजात स्थान देण्यात आले होते दोघेही आपल्या कर्मानुसार ते उच्च अथवा नीच होऊ शकतात तथागतांनी पुरुषाप्रमाणेच स्त्रियांना सुद्धा बुद्धी स्वातंत्र्याचा उपदेश केला पुरुषांना सांगितले की तुम्ही सुद्धा स्त्रियांची सेवा केली पाहिजे. फक्त महिलाकडून सेवेची अपेक्षा करू नये सिगालोवाद सुतात पत्नीचे कर्तव्य सांगताना म्हटले आहे की, पतीने आपल्या पत्नीचे पाच प्रकारे सेवा केले पाहिजे 1) आपल्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे 2) तिचा अवमान करू नये 3)परस्त्रीगमन करू नये 4)तिला धन संपत्ती देऊन गृहस्वामिनी करावी 5) दाग दागिने उंची वस्त्रे इच्छेनुसार देऊन संतोष ठेवावे. भगवान बुद्ध श्रावस्ती मधील जेतवनात विहार करीत होते त्यावेळी कोशल नरेश प्रसेन्नजित भगवंतांच्या जवळ बसून त्यांचा उद्देश ऐकत होता यावेळी मल्लिकाने एका कन्येला जन्म दिला ही सुवार्ता एका दुताने राजाला कळवली ती वार्ता ऐकून राजांचा चेहरा उदास झाला ती उदासिनता पाहून तथागत म्हणाले हे राजा नरेश काही काही स्त्रिया पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ बुद्धिमान शील संपन्न आई-वडिलांचीसासू-सासर्यांची सेवा करणाऱ्या व पतिव्रता असतात त्यामुळेच आपल्या कन्येचे चांगले पालन पोषण कर सर्व दिशा जिंकणारा महान शूरवीर पुत्र तिच्याच पासून जन्म घेतो स्त्री स्वातंत्र्याचा उद्गोष करून तथागत भगवान बुद्धांनी समस्त स्त्री वर्गाला सांगितले महिलांनो तुम्हाला सुद्धा पुरुषाप्रमाणे सारखेच अधिकार प्राप्त आहे तुम्ही सुद्धा संयम ठेवून मातृत्वाच्या पुढे जाऊन परमज्ञान प्राप्त करू शकता तुम्ही गृहस्वामिनीच नव्हे तर विश्वपूजनीय स्थान प्राप्त करू शकता विकारांचा नाश करून दुःखापासून मुक्त होऊ शकतात भगवान बुद्धांच्या समतेच्या संदेशाने प्रेरित होऊन अनेक महिला संसारिक बंधनातून मुक्त झाल्या पती, पुत्र, धन ,संपत्ती, ऐश्वर्या ,आधी उपभोगाचा त्याग करून निब्बाणागामी मार्गाने जीवनाची वाटचाल करू लागल्या. स्त्रियांना भिकुनी संघात प्रवेश देऊन भगवान बुद्धांनी महान कार्य केले आहे त्यांच्या या कार्यात प्रजापिता गौतमी यशोधरा पटाचारा सुजाता आम्रपाली किसा गौतमी अशा हजारो महिला सहभागी होऊन आपले स्वतःचे व अनेकांचे कल्याण केले ही समस्त महिला वर्गावर बुद्धांची महान करुणा होती . राजा शुद्धोधनाच्या मृत्यूनंतर भगवान बुद्धांनी आपली सावत्र आई महाप्रजापिता गौतमी हिला भिकुनी होण्याची परवानगी दिली तिच्याबरोबर पाचशे शाक्य महिला प्रव्रजित झाल्या. पुढे काही काळातच भिकूंनी ची संख्या वाढत जाऊन एक मोठा संघ तयार झाला वेगवेगळ्या कुळातून निरनिळ्या जातीतून आणि जीवनाच्या नाना प्रकारच्या अवस्थेतून प्रव्रजित होऊन त्यांनी तथागताचा परम शांतीचा मार्ग स्वीकारला होता यामध्ये भद्दाकुंडलकेसा, पटाचारा खेमा ,चाला, उपचाला किसा गौतमी पुण्णिका, आम्रपाली, रोहिणी, सुंदरी, अभिरुपा, उप्पलवना, महाप्रजापिता गौतमी, यशोधरा, धम्मदिना अशा हजारो महिलांनी धम्माच्या भिकुनी संघात प्रवेश करून आपले जीवन यथार्थपणे अहर्तप्रत प्राप्त करून निब्बाणाप्रती गेलेले आहेत यामध्ये मी आपणास काही महिला भिकुनींचा प्रसंग आपल्यापुढे मांडत आहे. पुण्णिका महिला भिकुनी श्रावस्तीमध्ये जन्म झाला होता कोषाध्यक्ष अनाथ पीडिकांच्या घरी आलेल्या दाशीची ही मुलगी सिंहनाद सुताचा उपदेश ऐकून तिला स्त्रोतापति फलाची प्राप्ती झाली. एके दिवशी पाण्याने स्नान केल्याने शुद्धी होते असे मानणाऱ्या एका ब्राह्मणाला पुण्णिकेने विशध्दच्या खऱ्या मार्गाकडे वळवले . त्यामुळे अनाथपिंडीकाला तिच्याबाबतीत खूप श्रद्धा वाटू लागली त्यामुळे त्याने तिला दास्यातून मुक्त केले. काही दिवसांनी ती अनाथपिंडीकाच्या परवानगीने भिकूणी संघात प्रविष्ट झाली. ध्यान साधना करीत तिने अल्पावधीतच अर्हतपदाचा साक्षात्कार केला ब्राह्मणाबरोबर झालेला संवाद आणि आपला पुर्वाणुभव करताना ती म्हणते कुशल कर्म करण्यासाठी व आपल्या हातून घडलेले पाप कर्म नष्ट करण्यासाठी मी हे थंड पाण्यात उतरून पुण्य कर्म करतो पण यापुढे पुण्णिका म्हणते जसे पाप नष्ट होते त्याचबरोबर पुण्य ही नष्ट होणार नाही का? पाण्यात स्नान केल्याने ज्या पापा पासून मुक्ती मिळते तर सर्व पाण्यातील बेडूक साप मगर कासव सुसर जलचर प्राणी पाण्यात राहणारे सर्व प्राणी हे सर्वच्या सर्व निश्चितच स्वर्गात जातील अशा तऱ्हेने त्या ब्राह्मणाचे मन वळवून त्याचे प्रबोधन केले. 2) रोहिणी वैशाली नगरी मधील एका वैभवशाली ब्राह्मण कुटुंबात रोहिणीचा जन्म झाला होता भगवान बुद्ध वैशालीला विहार करीत असताना त्यांचा धम्मोपदेश ऐकला त्यामुळे रोहिणीला धम्माप्रति श्रद्धा वाटू लागली बौद्धांच्या संघाबद्दल तिला अतिशय आकर्षक वाटते. असे एके दिवशीआई-वडिलांची परवानगी घेऊन तिने भिकुनी संघात प्रवेश केला परिश्रमपूर्वक साधना करून ते थोड्याच अवधीत अर्हतपद प्राप्त केले मला भिकू संघ का प्रिय वाटतो याचे वडिलांना उत्तर देत ते सांगते की त्यावेळी वडिलांचे झालेले संवाद खालील प्रमाणे मांडलेला आहे वडील म्हणतो हे रोहिणी श्रमाचे नाव घेऊन तो नित्यनेमाने वागतेस सकाळी उठताना त्याचे नाव घेते झोपताना नाव घेते जागे होतेस त्यांचे गुणगान गातेस त्यांना पुष्कळ अन्न पाण्याचे दान देतेस हे श्रमण काम करत नाहीत आळशी आहेत दुसऱ्यांच्या दाण्यावर जगणारे आहे लोभी व स्वादिष्ट भोजनाची इच्छा करणारे असे श्रमण तुला प्रिय का वाटतात त्यावर रोहिणीने उत्तर दिले. बाबा हे श्रमण शुद्ध कर्म करणारे असून ते कायाने वाचणे मनाने ते सर्व पाप नष्ट झालेले आहेत ते धम्माप्रमाणे जीवन जगणारे आहेत ते कोणावरही रागवत नाही कुणाची निंदा करीत नाही आपल्या पात्रामध्ये जे वाढलेले आहेत ते ग्रहण करणारे ते लोभी नाहीत तर ते मानवाच्या कल्याणाकरिता रात्रंदिवस धम्माच्या अभ्यास करून मनन चिंतन करून ते मानवाचे जीवन सुखी समृद्ध होण्याकरिता ते कशाची अपेक्षा करीत नाहीत ते कोठेही जाऊ शकतात जंगल वाड्या वस्ती डोंगर इत्यादी ठिकाणी ते पायी प्रवास करतात ते निर्भयपणे वागतात त्यांच्याकडे मैत्री करूणा या सद्भावना आहेत ते मानव जातीवरच नव्हे तर समस्त सजीव सृष्टीवर ही मैत्री करतात करुणा करतात आजही जंगलामध्ये ज्ञानज्योती भन्ते वाघ अजगर अस्वल असे अनेक पाण्यासोबत जंगलात राहतात यामध्ये त्यांची करुणा दिसून येते.भद्रा कुंडल केसा राजगृहामध्ये एका व्यापाराची मुलगी मोठा परिवार अतिशय सुखासमाधानाने ते राहत होती वडिलांची अतिशय प्रिय अशी मुलगी होती त्यावेळेला राजपुरोहिताचा सुत्थक नावाच्या मुलाने चोरीचा अपराध केला म्हणून त्यास वधस्थानी शिक्षा करण्यासाठी नगररक्षक घेऊन जात होते त्यावेळेला भद्दा कुंडलकेसा त्या मुलावरती मोहित वाहून ती आकर्षित झाली त्याचबरोबर माझे लग्न करून द्या नाहीतर मी मरण त्या नंतर त्या दोघांचे मोठ्या थाटामाटात आनंदात लग्न करून देतात. काही दिवसानंतर सुत्थकाला भद्रा कुंडलकेशा च्या अंगावरील दाग दागिन्याचा मोह जडला तो तिला विश्वासात घेऊन म्हणाला वधस्थानी जात असताना मी देवतेला नवस केला की यातून जर माझी सुटका झाली तर मी ते नवस फेडण्यासाठी तुझ्याकडे येईल त्या वेळेला तो भद्राला म्हणाला की आपण त्या देवीची पूजा करण्यासाठी नवस फेडण्यासाठी पर्वतावर जाऊया त्यावेळी नोकर चाकर घेऊन भद्दा कुंडलकेसा व सुत्थक नवस फेडण्यासाठी पर्वताकडे निघाले वाटेतच सेवकांना सुत्थकाने घरी पाठवले पत्नीला एकटीच घेऊन पर्वतावर निघाला अंगावरील सर्व दागिने काढ दागिने व मी हे तुमचीच आहे हे ते मला माहित नाही भद्दा कुंडलकेशा चतुर हुशार होती त्यावेळी ते म्हनते तुमच्या इच्छेप्रमाणे मी वाघेन पण माझी एक इच्छा आहे या वस्त्रालंकरांनी आपणास आलिंगन घेऊ द्या. त्यावेळी ति पत्तीला जोरदार धक्का देते तो पर्वतावरून कोसळला तो तेथेच मरण पावला. त्यावेळी तेथील देवता प्रसन्न झाली सर्व ठिकाणी पुरुष चतुर नसतात त्यावेळी ते घरी न जाता संसारात त्याग केला ते जैन मुनिच्या आश्रमात गेली धर्माची दीक्षा घेतली केसाचे मुंडण केले परत केस वाढले ते कुरळे कुंडला सारखे झाले त्यामुळे कुंडल केसा हे नाव पडले शास्त्राचा अभ्यास केला की त्यात पारंगत झाली अनेकांकडून ज्ञान मिळवले वाद-विवाद करू लागली गावाच्या प्रवेशद्वारा जवळ वाळूत जांभळाची फांदी राहून रोवत असे करीत ते श्रावस्ती नगरीत आली सारिपुत्ताणी ते फांदी उचलली व भेद्दा कुंडलिकेला ते समजल्याने ते शाक्य पुत्रा श्रमण बरोबर माझा सादसंवाद होणार आहे तिने सारीपुत्ताकडे अनेक प्रश्न विचारले सर्व प्रश्नांची योग्य उत्तर दिले त्यावर सारीपुत्ताणी एक प्रश्न केला एक वस्तू काय आहे याचे उत्तर ते देऊ शकेल नाही ते त्यांना शरण गेली श्रेष्ठ पुत्र भगवान बुद्धाला शरद जा त्यावेळी ती भगवान बुद्धाकडे गेली बुद्ध आणि तिला उपदेश दिला ते अहर्त पदाचा साक्षात्कार झालेपटीचारा श्रावस्तीमध्ये एका व्यापाऱ्याच्या घरी जन्म ती मोठी झाल्यावर स्वतःच्या घरी नोकर असलेल्या मुलाच्या प्रेमात पडते. आई वडील तिच्या लग्नाची चर्चा करीत होते त्यावेळी ती त्या नोकराबरोबर पळून जाते. ते दोघेजण एका गावात राहू लागले कालांतराने तिला दिवस गेले बाळंतपण जवळ आल्यावर आपण माझ्या माहेरी जाऊ असे ती पतीला सांगितले पतीने तिच्याबोलण्याकडे दुर्लक्ष केले एके दिवशी पत्तीला न सांगताच ती माहेरचा रस्ता धरून शेजाऱ्यांना निरोप देऊन चालली काही वेळाने पती घरी आला त्यालाही बातमी समजली तोही तिच्या पाठोपाठ गेला व तिला रस्त्यात गाठले ते वाटेतच बाळंत झाली. त्यावेळी ते दोघे घरी परत आले पुन्हा दुसऱ्या वेळेला दिवस गेले परत ती माहेरच्या रस्त्याने निघाली परंतु त्यावेळी मोठे वादळ सुटले आकाशात मेघ गोळा होऊ लागले विजा कडकडीत होत्या मोठा पाऊस पडू लागला ती नवऱ्याला म्हणाली आपल्यासाठी कुठेतरी आसरा पहा त्यावर त्यास एक लांब गवताची झोपडी दिसली तेथे आपण आश्रय घेण्यासाठी ते जागा स्वच्छ करण्यासाठी तेथे गेला परंतु तेथे वारूळ होते त्यातून साप बाहेर आला सापाने त्याला दंश केला तो विषबाधाने तेथेच मरण पावला. तिकडे पटाचारा रस्त्यातच बाळंत झाली रातभर तिथेच पडून राहिली सकाळी उजाडल्यावर पाहते दोन्ही मुलांना जवळ घेऊन पतीचा शोध घेते तर पती मरण पावलेला दिसला माझ्यामुळे नवरा मरण पावला म्हणून ती खूप रडू लागली शेवटी ते निराश्रित निराधार झाल्याने माहेराकडे दोन्ही मुलांना घेऊन निघाली रात्रभर पाऊस पडल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेले होते माहेरी जाताना रस्त्यात नदी आडवी असते बाळंतपणामुळे शरीर दुर्बल झाल्याने दोन्ही मुलांना घेऊन नदी ओलांडणे शक्य नव्हते प्रथम नवजात शिशुला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेली किनाऱ्यावर ठेवून एका झाडाच्या फांद्यावर ठेवले. परत दुसऱ्या मुलाला आणण्यासाठी परत नदीत उतरली जात असताना ती मागे मागे वळून पाहत होती नदीच्या मध्यभागी गेल्यावर बहिऱ्या ससान्याने बाळाला उचलून नेले त्याला हाकण्यासाठी हात वरती करून ती मोठ मोठ्याने ओरडत होती. त्याचवेळी इकडचा मुलगा आई आपणास हात उंचावर बोलावत आहे असेच समजल्याने तो नदीच्या प्रवाहात आला व तो वाहून गेला नवरा व दोन्ही मुलं आपल्या डोळ्या देखत मरण पावली अशाप्रकारे शोकाकुल होऊन रडत रडत श्रावतीच्या मार्गाने जात असताना तिला एक व्यक्ती भेटली तो श्रावस्थेमध्येच राहणार होता तिने त्याच्याकडे आपल्या आई वडील भावा बद्दल विचारले असता तो म्हणाला हे भगिनी कालच्या पावसाने घर कोसळून पडले त्यात ते तिघेजण मृत्यू पावले व तो जो धूर निघत आहे ना तो एकाच चितेवर तिघांना दहन करीत आहेत या सर्व दुःखाने ते वेडी होऊन इकडे तिकडे भटकू लागली. आपल्या अंगावर वस्त्र आहे का याचे तिला भानच राहिले नाही. त्यामुळे तिचे नाव पटाचारा असे पडले त्यावेळी भगवान बुद्ध मोठ्या धम्मपरिषदमध्ये बसून धम्मोपदेश करत होते भगवान बुद्धांनी पटाचारा हिला येताना पाहिले त्यावेळी तिला अडवण्याचा काहींनी प्रयत्न केला त्यावेळी बुद्धांनी तिला येऊ द्यावी अशी सूचना केली ती भगवंताजवळ आली भागवत म्हणाले हे भगिनी तो भानावर ये स्मृती प्राप्त कर जागृत ठेवून भगवंताच्या कृपेने ते भानावर आली तिची पूर्वीचे स्मृती जागृत झाली आपल्या अंगावर वस्त्र नाही हे तिला समजल्याने ती लज्जने खाली बसली एकाने तिच्या अंगावर वस्त्रे टाकली व ते वस्त्रे नेसली भगवान बुद्धा जवळ जाऊन ते त्यांना अभिवादन करून आपली करून कहानी दुःख सांगितले त्यामुळे माझे रक्षण करा. सर्व दुःखाचा प्रसंग सांगितला हे ऐकून भगवान बद्ध म्हणाले पटाचारा चिंता करू नकोस तू योग्य ठिकाणी आले आहेस बुद्धांनी तिला योग्य असा उपदेश दिला ती शांत झाली मनाला शांती मिळाली तू जे हे अश्रू ढळत आहेस ते चार महासागरातील पाण्यापेक्षा जास्त आहेत अशा प्रकारे उपदेश दिल्यावर तिचा शोक कमी झाला तेव्हा तू आपले शील शुद्ध कर निब्बाणागामी मार्गाचा अवलंब कर हे तुझे शरण स्थान आहे हा उपदेश ऐकल्यावर तिला स्त्रोतापती फल प्राप्त झाली भिकुनी जवळ जाऊन ते साधना करू लागले तिला निर्वाण पदाचा साक्षात्कार झाला. अशावेळी सर्वसाधारण महिला असते तर ती आपला पती मरण पावला दोन्ही मुलं नदीमध्ये वाहून गेले. एकाला बहिरा ससाण्याने घेऊन गेला. अशावेळी ती व्याकुळ होऊन माहेराकडे जाण्यासाठी निघाली तिथेही आई-वडील भाऊ तिघांचा मृत्यूची बातमी समजली त्यावेळी ही तिला आपला जीव गमवा की काय असे वाटले परंतु तेथे भगवान बुद्धांच्या धम्माचा रस्ता धरला व त्या धम्मात येऊन ती भिकुनी झाली व आपले जीवन यथार्थपणे जगून अर्हतप्राप्त करून निब्बाणाकडे पोचली अशी ही पटाचऱ्या दुसरी होणे नाही नाशिक
प्रतिनिधी डॉ. शाम जाधव, नाशिक जिल्हा