टाकेद परिसरात परतीच्या पावसाने भातपिकांची नास धुस व कोलमडून माती मोल गेली पंधरा दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडल्याने टाकेद,आधरवड ,अडसरे, मायदरा,सोनोशी, बार शिंगवे, वासळी,इंदुरे, खडकेत, आंबेवाडी, गंभिरवाडी,खेड, बांबळेवाडी,फळ विहीर वाडी,अशा विविधठिकाणी नुकसान झाले आहे.तर काही ठिकाणी करपा रोगाने थैमान घातले आहे.सोयाबीन,उडीद,वरी, नागली या ही पिकांचे नुकसान झाले आहे.शेतकरी बळीराजा संकटात सापडला आहे.तोंडाशी घास आला असताना पावसाने नुकसान केली.त्यात दिपावली सण आला आहे.काहींचा सण साजरा करता येणार नाही.कर्ज बाजारी होऊन सण साजरा करावा लागेल अशी परिस्थिती झाली आहे.म्हणून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.शेतकऱ्यांच्या मागणीला दिलासा देऊन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
नाशिक तालुका प्रतिनिधी, अशोक पगारे ,(प्रकाशपर्व न्युज)