Homeप्रदेशपालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये संविधान दिन - अमृत महोत्सव 75 वे वर्ष साजरा...

पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये संविधान दिन – अमृत महोत्सव 75 वे वर्ष साजरा…

आज दि.26 नोव्हेंबरला पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या सर्कस ग्राउंडमध्ये संविधान दिन – अमृत महोत्सव 75 वे वर्ष मोठ्या प्रमाणावर साय.वाजता रॅली काढुन साजरा करण्यात आला.ही रॅली घोषणा देत आंबेडकर चौक – नवापूर नाका-बोईसर स्टेशन -ओस्तवाल गेट – सर्कस ग्राउंड येथे रॅलीचा समाप्त करण्यात आले.यावळी कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून पालघर जिल्हा्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (भाप्रसे), प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड.रोशन पाटील (संविधान विश्लेषक रायगड), प्रमुख पाहुणे संभाजीराव भाले (निवृत्त न्यायमूर्ती, मुंबई),प्रा.प्रसन्ना बरुरे (प्रा.सोनोपंत दांडेकर लाॅ काॅलेज पालघर,विजय चौधरी (उपकामगार आयुक्त,पालघर),डाॅ.अशोक कांबळे (एम.डी.मेडीसिन,डाहाणु),राजेश दखने (कार्यकारी अभियंता म.रा.वि.पा.क.लि.बोईसर),मिनाताई घोदडे (सामाजिक कार्यकर्ते),रमाकांत पाटील (जेष्ठ पत्रकार),डाॅ.संतोष संगारे (ऑर्थो सर्जन,बोईसर) हे उपस्थित होते.त्यासोबतचं
पालघर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा, राष्ट्रीय पॅंथर आघाडी,ओबीसी हक्क परिषद-पालघर, आदिवासी एकता परिषद,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच पालघर पुर्व अशा 21
सामाजिक संघटनांनी सहभाग यावेळी घेतलेला होता.
कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत देवून सन्मानित करण्यात आले होते.

सुनिल शेलार, पालघर प्रतिनिधी, प्रकाशपर्व न्युज,9273523115

RELATED ARTICLES

Most Popular