Homeप्रदेशमुंबईतील मिरा- भयंडर येथे मार्गशीर्ष पौर्णिमा कार्यक्रम व श्रामनेर दिक्षा समापन विधी...

मुंबईतील मिरा- भयंडर येथे मार्गशीर्ष पौर्णिमा कार्यक्रम व श्रामनेर दिक्षा समापन विधी संपन्न….

धम्मसम्राट अशोक बुद्धविहार, येथील धम्मसेवक आयु.राजेश बडेकर व आयु.लहू तायडे हे बोधगया,बिहार याठिकाणी इंटरनॅशनल तिपिटीका चॅटिंगमध्ये सहभागी झाले असून दिनांक 01/12/2024 पासून पुज्यभदंत किर्तीपियो नागसेन थेरो यांच्याअंतर्गत “श्रावकालिक श्रमनेरी दिक्षा” देवून प्रवज्जित करण्यात आले आहे.

धम्मसेवक राजेश बडेकर,(श्रामनेर बोधीपाल) धम्मसेवक लहू तायडे (धम्मधर) हे भगवान बुद्धांना ज्याठिकाणी बुद्धत्व प्राप्त झाले अशा पावनभूमी बोधगया (बिहार) याठिकाणी श्रामनेरी जीवन व्यथीत करीत आहेत.ते बौद्धधर्म संस्कृतीप्रमाणे श्रामनेरी जीवन संपवून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणार आहेत.त्याकरीता होणारा पारंपारिक धम्मविधी सोहळा दि.15/12/2024 रोजी धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार मीरा-भाईंदर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

सोहळ्यात 15/12/2024 रोजी सायंकाळी 06.30 वाजेपासून सुरू झाले होते. त्यानंतर 6.30 वा.धम्मसम्राट अशोक बुध्दविहार मुख्यप्रवेशद्वार ते बुध्दविहार पारंपारिक धम्मरॅली व विहारास परिक्रमा करण्यात आली.7.00 वाजता नियमित सुत्रपठण,भंते किर्तीपियो नागसेन थेरो यांच्याकडून परित्राण पुजापाठ व आशीर्वाद सोहळ पार पडला.त्यानंतर 7.35 वाजता भिक्खूसंघास अष्टपरिस्कार दान, द्रव्य दान हे यावेळी उपस्थित उपासक,उपासिका यांच्याकडून देण्यात आले व अशाप्रकारे श्रामनेर दिक्षा सोहळ्याचे समापण झाले.त्यानंतर 7.45 वाजता धम्म देसना-भदन्त किर्तीपीयो नागसेन थेरो यांच्याद्वारे देण्यात आले व 8.15 वाजता खिरदान व भोजनदान (श्रामनेर बोधीपाल व धम्मधर तसेच श्रद्धावान उपासक उपासिका धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार मिरा -भाईंदर.) आयुनी मंगला साळवे यांचेकडून मिष्टान्न(बुंदी)वाटप करण्यात आले,आयुनी.मायाताई तायडे यांच्याकडुन खिरदान वाटप करण्यात आले.आयुनि.ज्योती कांबळे यांच्याकडून पुष्पहार आणि फुल सजावट मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.

ह्या सोहळ्यात सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करून आले होते.त्यासोबतचं अगरबत्ती,मेणबत्ती ,पुष्पहार सुद्धा सर्व घेऊन आलेले होते.श्रामनेर दिक्षा समापन व पौर्णिमा असल्याने अष्ट परिस्कार दान,फल दान इत्यादी कडून यावेळी इच्छेनुसार करण्यात आले होते.सदधम्माच्या सेवेत धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समिती व धम्मसम्राट अशोक बुध्द विहार वंदना ग्रुप तसेच मोठ्या प्रमाणावर बुद्ध उपासक व उपासिका यावेळी उपस्थित होते.

मुंबई प्रदेश समन्वयक,अनिल भगत,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular