Homeराजनितिअकोला येथे ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत शिवसेना (उ.बा.ठा) गटाच्या मोठ्या नेत्यानी केला हजारो...

अकोला येथे ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत शिवसेना (उ.बा.ठा) गटाच्या मोठ्या नेत्यानी केला हजारो कार्यकर्तेसह भव्य पक्षप्रवेश……

दि.16/02/2024 यशवंत भवन,अकोला येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या निष्ठावंत नेतृत्वावर विश्वास ठेवून सध्याची राजकीय अवस्था व उथलपाथल पाहून नांदेड जिल्ह्याचे बहुचर्चित नामांकित बंजारा समाजाचे मोठे नेते ज्यांनी एकदा निर्दलीय लोकसभा व बीएसपी पक्षाकडुन एकदा खासदारकी लढवून 1,18,357 मते मिळवले होते त्याचबरोबर मा.वसंतराव नाईक महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले तसेचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विद्यमान लोकसभा प्रमुख म्हणून कार्यभार पाहणारे माननिय डॉ.बि.डी.चव्हाण सर व त्यांच्या हजारो कार्यकर्ते व समर्थकांनी माननिय आदरणीय बाळासाहेब यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी) यांच्या उपस्थितीत यशवंत भवन,अकोला येथे भव्य पक्षप्रवेश केला आहे….

यावेळी उपस्थित हिंगोली जिल्हा अध्यक्ष मा.अनिल कांबळे सर व जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी,हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular