Homeप्रदेशमविआ च अंतरंग….!!

मविआ च अंतरंग….!!

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे अस्तित्व लोकसभा २०१९ मध्ये सिद्ध झाले आहे.ते म्हणजे केवळ एक खासदार निवडून आणण्याची ऐपत…!!
ऐपत एक जागा निवडून आणण्याची मात्र मविआ मध्ये मागणी २० जागांची ही अवाजवी मागणी कुणाच्या आणि कशाच्या बळावर.??
वास्तविक परिस्थिती अशी आहे की, कॉंग्रेस पक्षाचे दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष भाजपमध्ये गेले, आणि अनेकजण तिकडे जाण्याच्या तयारीत आहेत कारण कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचाराच्या गर्तेत रुतलेला असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाचं रिमोट कंट्रोल रिंग मास्तरच्या हातात आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत आणि निवडणूक पार पडेपर्यंत अर्धीअधिक कॉंग्रेस भाजपमध्ये विलीन झालेली असेल….!!
छातीवर हात ठेऊन एकही कॉंग्रेस पक्षाचा दिग्गज,पावरफुल वा जेष्ठ या नात्याने निष्ठावंत नेता सांगू शकत नाही की, यापुढे कॉंग्रेस मधला एकही जण भाजपमध्ये जाणार नाही.बहुतेक नेते भयग्रस्त आहेत आणि म्हणून संशयाचे धुके अतिशय गडद आहे, कॉंग्रेस मध्ये कुणाचाच, कुणावर भरवसा नाही….!!
कॉंग्रेस पक्षाला संविधान वाचवायचे असेल तर वस्तुस्थिती लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षाने वागावे आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन मविआ ला मजबूत करावे तसे होतं नसेल तर कॉंग्रेस पक्ष आपली घराणेशाहीज वाचविण्याचं काम करीत आहे,संविधानाशी कॉंग्रेसला काही देणेघेणे नाही.असेच सिद्ध होईल.काळ कॉंग्रेस पक्षाला माफ करणार नाही, संविधान बचाव, संविधान बचाव असा कंठशोष करुन संविधान वाचविता येणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे…!!
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपने खिळखिळे केले, त्यांचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी तथा कार्यकर्ते सुद्धा शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबतं गेलेले आहेत. अर्थात २०१९ मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची जी ताकद होती ती कायम राहली नाही, दोन्ही पक्ष क्षीण झालेले आहेत…!!
आजरोजी शरद पवार साहेबां सोबतं किती टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या सोबतं किती टक्के राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रश्न विचारला तर कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचे कारण असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे सत्तालोलूप या निकषांवर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते आणि आहेत, विचारांशी बांधिलकी मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकही नेता नाही…!!
शरद पवार साहेब यांच्या कडे केवळ दोन खासदार आहेत मात्र मविआ मध्ये मागणी १० जागांची आहे…!!
शरद पवार साहेबांनी अवाजवी मागणी करुन मविआ मध्ये कलह निर्माण करु नये, ते जाणते आहेत. आणि या आणिबाणीच्या काळातही शरद पवार साहेब, आडमुठेपणा करीत असतील तर शंकेला भरपूर वाव आहे. ते भाजपला छूपी मदत करीत आहेत का.?? अशी शंका निर्माण होतेय.त्याचे सबळ कारण असे की, खुद्द अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, शरद पवार साहेब यांनी भाजप सोबतं जाण्यासाठी आठ गुप्त बैठका घेतल्या आहेत ते २०१४ पासून भाजपच्या सतत संपर्कात आहेत…!!
भाजपने शिवसेना संपविण्याचा संकल्प केला आहे, कारण हिंदुत्ववादी मतांवर भाजप शिवाय हक्क सांगणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना. म्हणून शिवसेना संपविल्या शिवाय महाराष्ट्रातील संपूर्ण हिंदूत्ववादी मतदार आपल्या पारड्यात जमा होतं नाही ही सल भाजपच्या मनात रुतून बसली आहे आणि म्हणून शिवसेनेचे तुकडे तुकडे करून शिवसेना संपविणे हा भाजपचा दृढ संकल्प आहे…!!
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने विचार करावा की,शिवसेनेचे अस्तित्व कायम ठेवायचे की शिवसेना संपू द्यायची…!!
आणि म्हणून मविआ मधील घटक पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती चे आत्मचिंतन केले पाहिजे. तोंडाने संविधान वाचविण्याची भाषा करायची, संविधानवादी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप करायचा मात्र मविआ मध्ये येणाऱ्या समविचारी पक्षांसोबत दुजाभावाने वागायचे ही कृती कशासाठी…??
बोलायचं वेगळं आणि वागायचं मात्र नेमकं ऊलट हा दुटप्पीपणा कशासाठी..???
संविधान वाचविण्याची भाषा करायची मात्र भाजपला मदत होईल अशीच कृती करायची हे माकडचाळे कशासाठी…???
वंचित बहूजन आघाडी या प्रबळ संविधानवादी पक्षाला बदनाम करण्यासाठी पेड वर्कर पत्रकार, वापरून बदनामी ची मोहीम ऊघडण्याचे कारण काय…???
हातात असतील त्या सगळ्या टि. वी. चॅनेलवर पाकिट देऊन जाणिवपूर्वक प्रस्ताव या शब्दाचा विपर्यास करुन मागणी असा उल्लेख करायचा आणि त्या मागणीला अवाजवी मागणी आणि अट्टाहास असा आपल्या मर्जी प्रमाणे रंग द्यायचा, कुठेही उल्लेख नसलेला अटी आणि शर्ती असा जावईशोध लावायचा हा खुनशी प्रयोग कशासाठी…???
राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेला अद्याप मविआ मध्ये सामावून न घेण्याचे कारण काय.???
भाजप विरोधी विचारधारेचे राजकीय पक्ष एकत्र करून मविआ मजबूत करणे हा मविआ चा अजेंडा पाहिजे होता परंतु तसे न करता जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन आंबेडकरवादी मतदार, अल्पसंख्याक मतदार आणि भटके विमुक्त, आदिवासी मतदारांच्या जीवावर आपली घराणेशाही शाबूत ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आकांडतांडव करीत आहे हे आता जनतेच्या लक्षात आले आहे….!!
मविआ मधील घटक पक्ष कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अवाजवी जागेची मागणी करुन इतर समविचारी पक्षांना मविआ मध्ये येण्यापासून रोखतं आहेत ही अतिशय गंभीर बाब असुन तितकीच शंकास्पद सुद्धा आहे…!!
मविआ मधील घटक पक्षांनी समविचारी पक्ष जोडण्यासाठी एक तरी बैठक घेतली का.??? उत्तर नाही असेच आहे…!!
महायुती मधील महादेव जानकर यांचा रासप, रिपब्लिकन रामदास आठवले गट, नाराज आहेत, त्यांच्या सोबतं मविआ मधील नेतृत्वाने कधीतरी संवाद साधला का.??? उत्तर नाही असेच आहे…!!

मविआ मजबूत करण्यासाठी कुठलाच प्रयत्न न करणे…!!

समविचारी पक्षांना बदनाम करुन दुर ठेवणे…!!

प्रबळ संविधानवादी पक्षांचा मानभंग करणे…!!

अवाजवी जागांची मागणी करुन समविचारी पक्षाचा संकोच करणे…!!

स्वतः च्या पक्षातील भयभीत नेतृत्वाला थांबवण्यासाठी कोणतीच योजना न राबविणे….!!

आपापसात जागांची वाटणी करुन स्वार्थीलोलूप कृती करणे….!!

वरील सर्व कृती मविआ मधील नेतृत्वाच्या शंकास्पद वागण्याचे वाभाडे काढतं आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातील आम जनतेला कळून चुकले आहे की, तुम्ही संविधान वाचविण्यासाठी गंभीर नाही…!!

आपल्या पोळीवर तुप ओढणे एवढचं तुम्हाला माहीत आहे…!!

जयभीम.

प्रा.भास्कर भोजने
(फुले शाहू आंबेडकर विद्वत महासभा – महा.राज्य मार्गदर्शक)
मो.नं-9960241375

RELATED ARTICLES

Most Popular