Homeक्राइमजळगाव जिल्हयातील भडगाव तालुक्यात गरीब वडार परिवारावर झालेल्या अन्यायासाठी समता सैनिक दलाची...

जळगाव जिल्हयातील भडगाव तालुक्यात गरीब वडार परिवारावर झालेल्या अन्यायासाठी समता सैनिक दलाची पोलीस स्टेशनवर धडक……..!!!!!

जळगाव जिल्हयातील भडगाव तालुक्यातील ‘ पिंपरखेड ‘ या गावात वडार समाज बांधव राहत असून त्या किरकोळ कारणावरून गावातील संवर्ण समाजाच्या 7 ते 8 गावगुंडानी मारझोड करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि गावातून हाकलून लावले सदर पिंडीत कुटुंब हे आश्रय घेत इकडे तिकडे लपत फिरत होते.पोलीस स्टेशन मध्ये त्यांची फिर्याद घेतली जात नव्हती.परंतु त्यांच्या गावातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष मा.नानासाहेब धर्मभुषण बागुल साहेब यांची भेट घालून दिली.सदर घटनेची बागुल साहेबांनी पुर्ण माहिती घेत,समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष आयु. किशोर डोंगरे यांना या प्रकरणात पिंडीतांना न्याय मिळाला पाहिजे अशा सुचना दिल्या.त्यानुसार जिल्हाध्यक्ष आयु.किशोर डोंगरे यांनी कार्यकर्त्यांसह भडगाव पोलिस स्टेशन गाठले व आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.


सदर घटनेचा वृत्तांत असा की, मनोज सुकलाल गायकवाड वय 35 धंदा हातमजुरी रा.पिंपरखेड ता.भडगाव जि.जळगांव हे वरील ठिकाणी परिवारासह राहतात व मोल मजुरी करुन उपजिविका भागवितात. तसेच त्यांच्याकडे डुकरे,मेंढ्या,कोंबड्या असे पाळीव प्राणी आहेत.या सोबत मजुरीवर खोदकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.दिनांक 27/02/2024 रोजी आरोपींनी त्यांच्या शेतात या परिवाराचे 20 डुकरे विष घालून मारून टाकले.त्याचा जाब विचारला असता.वडार कुटुंबातील पुरुष व महिलांना प्रचंड मारहाण केली.तसेच 5 मेंढ्यांना घरी येवून विष खाऊ घालून मारून टाकल्या.


याबाबत भडगाव पोलीस स्टेशन मध्ये योग्य तो गुन्हा नोंदवून घेतला जात नव्हता. व पंचनामा ही केला नाही.
याबाबत समता सैनिक दलाने पुढाकार घेवून पोलीस स्टेशन मध्ये धडक दिली.व आरोपींवर गुन्हा दखल करण्यास भाग पाडले.

या सर्व प्रकरणात समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सकाळी 11:00 ते रात्री 10:00 वाजे पर्यत पिडीतांना औषध उपचार व जेवणाची व्यवस्था करत न्याय मिळून दिला.

मा.सचिन बार्हे
जळगाव जिल्हा समन्वयक
प्रकाशपर्व न्युज
मो.नं.-7066668723

RELATED ARTICLES

Most Popular