अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा लग्नसोहळा बुधवारी (4 डिसेंबर) तेलुगू रितीरिवाजांनुसार पार पडला.
चैतन्यचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हटलंय की, “शोभिता आणि चैतन्यला एकत्र या सुंदर प्रवासाची सुरुवात करताना पाहणे हा माझ्यासाठी अतिशय खास तसचे भावनिक क्षण आहे. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. शोभिता तुझे कुटुंबात स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात याआधीच खूप आनंद आणला आहेस.”
हैदराबादमधील प्रतिष्ठित अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये नागा चैतन्य आणि शोभिताने लग्न केले.